Korona Kalatil Maza Anubhav Bhashan: आदरणीय प्राचार्य महोदय, शिक्षक-शिक्षकेतर, आणि माझ्या प्रिय मित्रांनो,
आज मी तुमच्यासमोर कोरोना काळातील माझा अनुभव सांगणार आहे. तो काळ आपल्या सगळ्यांसाठी खूपच वेगळा होता, नाही का?
मला आठवतं, २०२० मध्ये जेव्हा अचानक शाळा बंद झाली तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला होता. आम्ही म्हणालो, “वा! आता घरी बसून खेळू!” पण काही दिवसांनी समजलं की हे सुट्टी नव्हती, तर एक मोठं संकट होतं. रस्त्यावर गर्दी नव्हती, दुकानं बंद होती, आणि आम्ही घराबाहेर पडूही शकत नव्हतो.
हे पण वाचा:- Marathi Rajbhasha Din Bhashan: मराठी राजभाषा दिन भाषण
सुरुवातीला ऑनलाइन क्लासेस झाल्या तेव्हा खूप मजा वाटली. मोबाईल किंवा लॅपटॉपवर शिकायला मिळतंय हे नवीनच होतं. पण हळूहळू ते कठीण होऊ लागलं. काही वेळा नेटवर्क नसायचं, तर काही वेळा शिक्षकांचा आवाज नीट येत नसायचा. मला सगळ्यात जास्त वाटायचं ते म्हणजे माझ्या मित्रांची आठवण. शाळेत एकत्र बसणं, खेळणं, गप्पा मारणं – हे सगळं बंद झालं होतं.
घरी फक्त आई-बाबा आणि माझे भाऊ-बहिण असायचे. आम्ही सगळे एकत्र राहायचो, पण घराबाहेर पडायला मिळत नव्हतं. आजी-आजोबांना भेटायला जाऊ शकत नव्हतो, आणि ते खूप वाईट वाटायचं. फोनवर बोलायचो पण त्यांना भेटून मिठी मारायला मिळत नव्हतं.
त्या काळात आम्ही घरीच खूप नवीन गोष्टी शिकलो. आईने शिकवलं कशी भाजी कापायची, लुसणाची चटणी कशी करायची. बाबांसोबत बागेत झाडं लावली. भावासोबत लुडो, कॅरम खेळलो आणि जुन्या खेळण्यांना पुन्हा शोधलं. मास्क घालणं, हात धुणं, सॅनिटायझर वापरणं – हे सगळं आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झालं.
पण सगळ्यात कठीण क्षण तेव्हा आला जेव्हा आमच्या शेजाऱ्यांना कोरोना झाला. त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आणि आम्हाला भीती वाटायची. पण मग लोकांनी त्यांना मदत केली, जेवण पोहोचवलं, आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या. तेव्हा समजलं की संकटाच्या काळात लोक एकत्र येतात.
हे पण वाचा:- Lokmanya Tilak Bhashan in Marathi: लोकमान्य टिळक भाषण मराठी
कोरोना काळाने आम्हाला खूप काही शिकवलं. आरोग्य किती महत्त्वाचं आहे, कुटुंब किती मौल्यवान आहे, आणि छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये किती आनंद आहे – हे सगळं समजलं. मला माझ्या शिक्षकांचं कष्ट समजले, डॉक्टर-नर्सांची कर्तव्यनिष्ठा समजली.
आज जेव्हा आपण पुन्हा शाळेत एकत्र आलो आहोत तेव्हा मला खूप आनंद होतो. प्रत्येक दिवस साजरा करायला हवा, प्रत्येक भेटीची किंमत समजायला हवी. कोरोना काळ कठीण होता, पण त्याने आपल्याला बळकट केलं आहे.
धन्यवाद!
1 thought on “Korona Kalatil Maza Anubhav Bhashan: कोरोना काळातील माझा अनुभव भाषण”